वृत्तसंस्था/ कोलकाता
16 वर्षाखालील वयोगटाच्या महिलांच्या पहिल्या सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत बांगलादेशच्या महिला फुटबॉल संघाने जेतेपद मिळविताना यजमान भारताचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला.
गेल्या दशकभराच्या कालावधीत बांगलादेशच्या महिला फुटबॉल संघाला भारतावर विजय नोंदविणे कठिण गेले होते. पण रविवारच्या अंतिम सामन्यात भारताच्या तुलनेत बांगलादेशचा खेळ अधिक दर्जेदार आणि वेगवान झाला. या समान्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे गोल बरोबरीत होते. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये बांगलादेशने भारताचा 3-2 असा पराभव केला. भारताने या सामन्यात आपले खाते चौथ्या मिनिटाला उघडले. भारतीय संघातील अनुष्का कुमारीने हा गोल केला. 70 मिनिटापर्यंत भारताला ही आघाडी राखता आली होती. मुनीने बांगलादेशला बरोबरी साधून दिली. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतातर्फे 2 गोल तर बांगलादेशने 3 गोल नोंदविले.









