वृत्तसंस्था/ गियानयार, इंडोनेशिया
इंडोनेशियाच्या गियानयार येथे रविवारी झालेल्या दोन मित्रत्वाच्या सामन्यांपैकी पहिल्या लढतीत इंडोनेशियाच्या 17 वर्षांखालील संघाने भारताच्या 17 वर्षांखालील पुऊष संघाचा 3-1 असा पराभव केला. दोन्ही संघ मंगळवारी त्याच मैदानावर पुन्हा आमनेसामने येतील.
15 व्या मिनिटाला यजमानांना पेनल्टी मिळाल्याने भारताला सुऊवातीलाच धक्का बसला. इव्हान्ड्रा फ्लोरास्टाने त्यावर गोल केला. इंडोनेशियाने त्यानंतर 51 व्या मिनिटाला आपली आघाडी वाढविली. यावेळी अहिबाम सूरज सिंगने फिरजतुल्लाहचा फटका अडविला, पण बचावपटू परत आलेला चेंडू फटकावण्यात अपयशी ठरून फंदी अहमदने डाव्या पायाने तो जाळ्याच्या कोपऱ्यात फटकावला. दोन मिनिटांनंतर भारताच्या लेव्हिस झांगमिनलुनने गोल करून आघाडी कमी केली. पण 62 व्या मिनिटाला फिरजतुल्लाहने इंडोनेशियाचा तिसरा गोल केल्याने भारताच्या पुनरागमनाच्या आशा धुळीस मिळाल्या.









