भुवनेश्वर : 20 वर्षांखालील वयोगटाच्या सॅफ फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी येथे यजमान भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना खेळविला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय फुटबॉल संघाने जोरदार तयारी केली आहे.
भारताच्या 20 वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाला यापूर्वीच्या सामन्यात बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर भारतीय संघाने सरावावर अधिक भर दिला असून आता ते लंकेवर विजय मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारतीय संघाला षण्मुगम वेंकटेशचे प्रमुख मार्गदर्शन लाभत आहे. या स्पर्धेत लंका संघाने यापूर्वीचे आपले दोन्ही सामने गमावले आहेत. बांगलादेशने लंकेचा 1-0 असा पराभव केला होता. त्यानंतर दुसऱया सामन्यात नेपाळने लंकेवर 3-0 अशी मात केली होती. भारत आणि लंका यांच्यातील शुक्रवारचा हा सामना भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर खेळविला जाईल.