वृत्तसंस्था /बँकॉक
येथे सुरु असलेल्या 17 वर्षाखालील वयोगटाच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी विद्यामान विजेत्या जपान बरोबर होणाऱ्या चुरशीच्या सामन्यात भारताला विजयासाठी अधिक झगडावे लागेल. ड गटातील हा भारताचा शेवटचा सामना आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. भारतीय फुटबॉल संघाला या स्पर्धेत यापूर्वीच्या सामन्यात विजयासाठी अधिक झगडावे लागले आहे. भारत आणि जपान यांच्यातील हा सामना शुक्रवारी येथील राजमंगला स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. भारतीय संघाला बिबीयानो फर्नांडिस यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
भारताने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली असली तरी या संघामध्ये अद्याप बऱ्याच काही त्रुटी बाकी आहेत. जपान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला अधिक आक्रमक आणि वेगवाग खेळ करावा लागेल. जपान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला विजयाची नितांत गरज आहे. या स्पर्धेत विद्यमान विजेता जपान हा एक बलाढ्या संघ म्हणून ओळखला जातो. या स्पर्धेत ड गट अद्याप पूर्णपणे खुला आहे. या गटातील सर्व म्हणजे चारही संघांना शेवटच्या आठ संघात स्थान मिळविण्याची समान संधी उपलब्ध आहे. दरम्यान भारता संदर्भात हे समीकरण थोडे कठीण वाटत आहे. या स्पर्धेतील भारताला पुढील फेरीत स्थान मिळविण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत जपानला पराभूत करण आवश्यक आहे. तसेच या गटातील उझ्बेक आणि व्हिएतनाम यांच्यातील सामना अनिर्णीत राहणे गरजेचे आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय फुटबॉल संघाला पहिले दोन सामने जिंकता आले नाहीत. व्हिएतनाम बरोबरचा सामना भारताने 1-1 असा बरोबरीत राखला. तर दुसऱ्या सामन्यात उझ्बेकने भारतावर 1-0 असा निसटता विजय मिळविला होता.









