स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टीट्यूटच्या अहवालात दावा : भारताकडे अधिक अत्याधुनिक क्षेपणास्त्र
वृत्तसंस्था/ स्टॉकहोम
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टीट्यूटच्या (सिपरी) अहवालात भारताकडे पाकिस्तानच्या तुलनेत अधिक अण्वस्त्रs असल्याचे म्हटले गेले आहे. भारताकडे पाकिस्तानच्या तुलनेत अण्वस्त्रs वाहून नेणारी क्षेपणास्त्रs अधिक आधुनिक आणि अधिक संख्येत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालामुळे आण्विक क्षमतांप्रकरणी भारत हा पाकिस्तानपेक्षा वरचढ असल्याचे स्पष्ट होते.
परंतु अहवालात पाकिस्तान अण्वस्त्र निर्मितीसाठी साधनं जमवित असून लवकरच त्याच्या अण्वस्त्रांच्या ताफ्यात वाढ दिसून येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. सिपरीच्या अहवालानुसार भारताकडे 2025 मध्ये सुमारे 180 अण्वस्त्रs आहेत. तर मागील वर्षी भारताकडे 172 अण्वस्त्रs होती. भारताने केवळ स्वत:च्या अण्वस्त्र ताफ्यात वाढ केली नसून अण्वस्त्रs वाहून नेणाऱ्या नव्या पिढीच्या आधुनिक क्षेपणास्त्रांनाही विकसित केल्याचे सिपरीने म्हटले आहे.
भारताच्या नव्या कॅनिस्टर क्षेपणास्त्रांद्वारे अण्वस्त्रांना अधिक सुरक्षेसह वाहून नेणे शक्य होणार आहे. तसेच नजीकच्या भविष्यात एकाच क्षेपणास्त्राद्वारे अनेक अण्वस्त्रs वाहून नेणेही शक्य ठरणार आहे पाकिस्तानकडे अण्वस्त्रांची चालू वर्षातील संख्या 170 इतकी आहे. तर मागील वर्षी देखील पाकिस्तानकडे याच संख्येत अण्वस्त्रs होती.
आण्विक युद्धाचा धोका गंभीर
भारताकडे अग्नि प्राइम क्षेपणास्त्र आहे, तसेच एमआयआरव्ही सक्षम अग्नि-5 क्षेपणास्त्र आहे, जे अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. अग्नि प्राइमचे परीक्षण मागील वर्षीच करण्यात आल होते आणि याचा मारक पल्ला 1000 ते 2000 किलोमीटरदरम्यान आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष झाल्यास पारंपरिक युद्ध आण्विक युद्धात बदलण्याचा गंभीर धोका असल्याची भीती सिपरीने स्वत:च्या अहवालात व्यक्त केली आहे. अहवालानुसार दोन्हीपैकी एका देशाच्या अण्वस्त्र साठ्यांवर हल्ला झाल्यास किंवा त्रयस्थ देशाकडून भ्रामक माहिती आणि चिथावणीमुळे दोन्ही देशांदरम्यान आण्विक युद्धाचा धोका अधिक आहे.
चीनकडून अण्वस्त्रांमध्ये मोठी वाढ
चीन स्वत:च्या अण्वस्त्रसाठ्याला सर्वात वेगाने वाढवत असल्याचे सिपरीच्या अहवालात म्हटले गेले आहे. 2023 पासून आतापर्यंत चीन दरवर्षी 100 अण्वस्त्रs निर्माण करत असून आणि आतापर्यंत त्याने 350 नवी आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs निर्माण केली आहेत. या दशकाच्या अखेरीस चीन, रशिया आणि अमेरिकेइतकी आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची निर्मिती करणारा देश ठरलेला असेल. परंतु चीन अद्याप रशिया आणि अमेरिकेच्या अण्वस्त्रांच्या तुलनेत खूपच मागे आहे. चीन पुढील 7-8 वर्षांमध्ये 1000 अण्वस्त्रs निर्माण करू शकतो असा अनुमान सिपरीच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.









