India is role model : जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री अॅनालेना बेअबॉक या आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. भारतात त्या अक्षय ऊर्जेच्या विविध प्रकल्पांना भेटी देणार आहेत. आज त्यांनी महात्मा गांधी यांच्या स्मृतीला भेट दिली. गांधीजींबद्दल जाणून घेतल्यानतंर भारताला स्वातंत्र मिळवणं खरचं इतक सोप्प नव्हतं हे कळालं आहे अशी प्रतिक्रिया अॅनालेना बेअबॉक यांनी दिली.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, ग्रामीण भागावर अक्षय ऊर्जेचा कसा परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे.भारताच कौतुक करताना त्या म्हणाल्या,जगातील अनेक देशांसाठी भारत हा रोल मॉडेल आहे. त्याचबरोबर अनेक देशांमध्ये सेतू म्हणूनही भारत काम करत आहे. भारताच्या लोकशाही आणि आमच्या लोकशाहीचे खूपच जवळच बंध आहेत. मुल्यांची जोपासणा,मानव हक्क,स्वातंत्र,लोकशाही आणि कायद्यावरचा विश्वास या गोष्टींवर हे बंध आधारित असल्याचेही बेअबॉक यांनी म्हटलं आहे.
Previous Articleया साड्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात!
Next Article MPSC कडून सर्वसाधारण गुणवत्तायादी जाहीर









