नवी दिल्ली :
इराणने पाकिस्तानवर केलेली कारवाई अंतर्गत बाब असून भारत संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. इराणच्या या हल्ल्याने पाकिस्तान हा दहशतवादी देश असल्याचे सिद्ध होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आता मुस्लीम जगतानेही पाकिस्तानच्या भूमीत घुसून हल्ले करायला सुऊवात केली आहे. दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान सुरक्षित आश्र्रयस्थान असल्याचे आता सर्वपरिचित आहे. आता इराणही पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या मागे लागला असल्याचे भारताने म्हटले आहे.









