केंद्रीय पर्यटनमंत्री रे•ाr यांचे प्रतिपादन : जी 20 पर्यटन कृतिगट परिषदेस प्रारंभ,व्रुझ पर्यटन विकासासाठी विचारविनिमय
पणजी : केंद्रीय संस्कृती, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकासमंत्री जी. के. रेड्डी आणि केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांच्या उपस्थितीत काल सोमवारी येथे दोन अत्यंत महत्त्वाच्या अनुषंगिक कार्यक्रमांच्या आयोजनासह जी-20 समूहाच्या पर्यटनविषयक कृतिगटाच्या चौथ्या परिषदेला सुऊवात झाली. गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांच्यासह केंद्रीय पर्यटन सचिव व्ही. विद्यावती यावेळी उपस्थित होत्या. यावेळी आयोजित करण्यात आलेला पहिला कार्यक्रम ’क्रुझ पर्यटनाला शाश्वत आणि जबाबदार प्रवासासाठीचा आदर्श नमुना म्हणून आकार देणे’ या संकल्पनेवर आधारित होता. यावेळी संबोधित करताना केंद्रीय मंत्री जी. के. रेड्डी म्हणाले की, गोव्यामध्ये सूर्यप्रकाश, वाळू आणि समुद्र यांचा परिपूर्ण संगम पाहायला मिळतो. प्रत्येकाने भारतातील या सुंदर राज्यातील पर्यटनाचा अनुभव घ्यायला हवा. गोव्यातील स्नेहार्द्र आणि मनोरंजनप्रेमी लोक तजेलदार संगीत आणि स्वादिष्ट भोजनासह जीवनाचा आनंद घेतात, असेही ते म्हणाले.
सागरी क्षेत्रातही भारत आघाडीवर
भारताला सात हजार पाचशे किलोमीटर लांबीचा किनारा लाभला आहे आणि त्यामुळे आपला देश सागरी क्षेत्रात आघाडीचा देश झाला असून भारतीय सभ्यता आणि संस्कृती यांनी आशियावर जो प्रभाव टाकला आहे त्यातून आपल्या समृद्ध सागरी इतिहासाचे दर्शन होते. यामध्ये आजच्या व्हिएतनाममधील चंपा राज्य तसेच मोंबासा बंदरातून आफ्रिकेशी होणारा भारताचा व्यापार यांचा समावेश आहे. चौपाटी पर्यटन, दीपगृह पर्यटन, आणि क्रूझ पर्यटनाद्वारे किनारी पर्यटनाला चालना दिल्याने मासेमारी करणाऱ्या समुदायांना उपजीविकेच्या इतर संधी उपलब्ध होतील आणि त्यांच्या उत्पन्नात भर पडेल. भारत सरकारने 75 पेक्षा जास्त दीपगृहांच्या जवळच्या क्षेत्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी एक कार्यक्रम आखला आहे, असेही रेड्डी यांनी सांगितले.
नमामि गंगे मिशनवर 35 हजार कोटी खर्च
सरकारने नमामि गंगे मिशनच्या माध्यमातून 4.3 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त, म्हणजे 35,414 कोटी ऊपये खर्च केले असून, स्वच्छ नद्यांमुळे क्रूझ पर्यटनासारख्या उपक्रमांना चालना मिळेल, असे त्यांनी अधोरेखित केले.
गोवा व्रुझ पर्यटनातून सर्वांना भरभरुन देते : नाईक
यावेळी श्रीपाद येसो नाईक म्हणाले की, या कार्यक्रमाने क्रूझ पर्यटनामधील अफाट क्षमतेवर आणि त्याच्या जगभरातील कामगिरीवर प्रकाश टाकला आहे. गोवा हे स्थान बॅकपॅकर्सपासून ते अलिशान प्रवाशांपर्यंत, सर्वांसाठी भरभरून देते. गोव्यामधील वास्तुकला ही चित्ताकर्षक पोर्तुगीज बंगले आणि आधुनिक हॉटेल्स यांचा मिलाफ आहे. गोवा कार्निव्हल, सनबर्न फेस्टिव्हल यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध महोत्सवांसाठीही गोवा राज्य ओळखले जाते. त्यामुळे जगभरातील पर्यटक गोव्याकडे आकर्षित होतात. गोव्याच्या समृद्ध वारशाचे दर्शन या महोत्सवांतून घडते, असे नाईक म्हणाले. यावेळी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत पर्यटन मंत्रालयाने एआरबीएनबीशी सामंजस्य (एअर बेड अँड ब्रेकफास्ट सेवा) करार केला. जी-20 बैठकीबरोबर आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये समूह चर्चा झाली. यामध्ये अनुभवांची देवाणघेवाण, कार्याची सर्वोत्तम पद्धती, कार्यासाठी शिफारसी, तसेच पुढील वाटचालीविषयी माहिती आणि भागीदारी वाढवल्यामुळे होणारा लाभ, यावर पॅनेल चर्चेचे आयोजन झाले.
पर्यटन विस्तारासाठी गोवा सरकार कटिबद्ध : पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचे निवेदन
इको, अध्यात्म, योग व आयुर्वेद पर्यटनासह गोव्यातील आंतरग्राम पर्यटनाला नवा आयाम देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन अशोक खंवटे यांनी दिली. जी 20 समूहाच्या बैठकीत उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राज्यांतर्गत पर्यटन सेवांचा विस्तार करताना ‘देखो अपना देश संकल्पने’ला प्राधान्य दिले आहे. देशाची महत्त्वपूर्ण शहरे रेल्वे, हवाई सेवेद्वारे जोडताना नव्या आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्यात येतील. गोवा डेहराडून थेट विमान सेवेद्वारे उत्तरकाशी दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या गोव्याशी जोडली गेली आहे. गोव्याचा सांस्कृतिक वारसा व आंतरग्राम पर्यटनाचे ब्रँडिंगही करणार आहे. येथील वेगवेगळ्या उत्सवांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर नेऊन पर्यटन विस्तार करण्याची राज्य सरकारची योजना असल्याचे खंवटे पुढे म्हणाले.









