रत्नागिरी :
आमच्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भारत हे आमचे हिंदू राष्ट्र आहेच. या हिंदू राष्ट्रात कुठल्याही जिहादी लोकांचे उदात्तीकरण करायचे असेल तर त्यांच्या ढुंगणावर लाथ मारून पाकिस्तानात पाठवण्याची सगळी औषधे आमच्याकडे आहेत, असे राज्याचे मत्स्य आणि बंदर विकासमंत्री नीतेश राणे यांनी आपली औरंगजेब समर्थकांवर सडेतोड भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.
रत्नागिरी दौऱ्यावर गुरुवारी असलेल्या मंत्री नीतेश राणे यांनी राजकीय घडामोडींवर आणि टीकाकारांवरही जोरदार शरसंधान साधले. तुम्हांला सगळे लाड, मस्ती करायची असेल तर पाकिस्तानात, बांगलादेशात जावा, असाही सल्ला दिला. तेथे मांडीवर तुम्हाला बसवतील, पण आमच्या हिंदू राष्ट्रात कुठेही उदात्तीकरण करायला जमणार नाही. मग धाराशिव असो वा मुंबईतील काही भाग असो. जिहाद्यांना पळवून लावण्याचे टप्याटप्प्याने कार्यक्रम हाती घेतले जाणार असल्याचे मंत्री नीतेश राणे यांनी सुनावले.
रत्नागिरीतील लोकांनी भगवे मफलर वापरावेत, असे सांगत राणे यांनी मंत्री उदय सामंत यांना टोला लगावला. मालवण येथील आपल्या भाषणाबाबत त्यांनी आपल्या केलेल्या विधानाचा पुनरुच्चार केला. हा देश हिंदु राष्ट्र आहे आणि जे कोणी औरंगजेबाचे समर्थक आहेत, त्यांना परत पाठवले जाईल, असे ठामपणे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
- उद्धव ठाकरे ‘बेभरवशी’ व्यक्ती
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्या संभाव्य युतीवर टीका केली. कोण कोणासोबत जाते, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, पण उद्धव ठाकरे हे बेभरवशी व्यक्ती आहेत. ज्या काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला, त्याच काँग्रेसला त्यांनी नंतर हाकलून लावले, असा आरोप मंत्री नीतेश राणे यांनी केला.








