5 वर्षांत 1 लाख कोटींच्या शस्त्रास्त्रांची खरेदी ः पाश्चिमात्य देशांचा दबाव ठरला निष्प्रभ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रशियाकडून शस्त्रास्त्रs खरेदी करण्याप्रकरणी भारत जगात पहिल्या स्थानावर असल्याचा दावा रशियाच्या वृत्तसंस्थेने केला आहे. या वृत्तसंस्थेनुसार मागील 5 वर्षांमध्ये रशियाने सुमारे 13 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1 लाख कोटी रुपयांची शस्त्रास्त्रs भारताला पुरविली आहेत. रशियाच 20 टक्के शस्त्रास्त्रांची खरेदी केवळ भारताकडूनच होत आहे. युक्रेन युद्धामुळे रशियावर निर्बंध लादण्यात आले असले तरीही दोन्ही देशांच्या शस्त्रास्त्र करारांवर कुठलाच प्रभाव पडला नसल्याचे म्हटले गेले आहे.
भारतासह चीन तसेच अनेक दक्षिणपूर्व आशियाई देशांनी रशियाकडून शस्त्रास्त्रs खरेदी करण्यासाठी स्वारस्य दाखविले असल्याचा दावा रशियाच्या फेडरल सर्व्हिस फॉर मिलिट्री टेक्निकल कॉर्पोरेशनचे प्रमुख दिमित्री शुगायेव्ह यांनी केला आहे.
अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी भारताने रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करू नयेत म्हणून दबाव आणला होता, परंतु भारताने या दबावाला झुगारून देत दोन्ही देशांमधील संबंधांना महत्त्व दिले. आशियाई देश रशियाच्या काही निवडक शस्त्रास्त्रांमध्ये अधिक रुची दाखवत असल्याचे शुगायेव्ह यांनी सांगितले.
आशियाई देशांच्या पसंतीची शस्त्रास्त्र
1 एस-400 ट्राइंफ मिसाइल डिफेन्स सिस्टीम
2 शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाइल सिस्टीम
3 एसयु-30 लढाऊ विमान
4 मिग-29 लढाऊ विमान
भारताची भूमिका
भारतावर वेळावेळी पाश्चिमात्य देश रशियाकडून कच्चे तेल आणि शस्त्रास्त्रs न खरेदी करण्यासाठी दबाव टाक अताहेत. भारत आणि रशियाची कित्येक दशकांची भागीदारी असून यामुळे भारताला मोठा लाभ झाला आहे. पाश्चिमात्य देश पाकिस्तानसारख्या सैन्य हुकुमशाहीचे समर्थन करत असताना रशियाने भारताला शस्त्रास्त्रs पुरविली होती. भारत कुणाच्याही दबावाखाली येणार नाही, तर स्वतःच्या हितांचा विचार करत निर्णय घेणार असल्याचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.









