वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील जकार्ता येथे झालेला मित्रत्वाचा दुसरा फुटबॉल सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. भारताने पहिल्या मित्रत्वाच्या सामन्यात इंडोनेशियाचा 2-1 असा पराभव केला होता.
दुसऱ्या सामन्यामध्ये मध्यंतरापर्यंत उभय संघाकडून गोल नोंदविला न गेल्याने गोलफलक कोराच राहिला. पण उत्तराधार्तातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला म्हणजे सामन्यातील 47 व्या मिनिटाला कोरुसिंग थिंगजामने भारताचे खाते उघडले. 71 व्या मिनिटाला डोणी पामुंगकेसने इंडोनेशियाला बरोबरी साधून दिली. शेवटच्या 10 मिनिटांच्या कालावधीत भारताला आघाडी देण्याची संधी मिळाली होती. पण इंडोनेशियाच्या भक्कम बचावफळीमुळे भारताला या सामन्यात इंडोनेशियाने विजयापासून वंचित केले.









