केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताने चालू आर्थिक वर्षाच्या पा†हल्या सहामाहीत 2.3 लाख कोटी ऊपयांचा 13 कोटी 19.2 लाख टन कोळशाची आयात केली आहे. राज्यसभेत लेखी उत्तर देताना कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सां†गतले की, 2021-22 आर्थिक वर्षात भारताने 2.28 लाख कोटी ऊपयांचा 20 कोटी 89.3 लाख टन कोळसा आयात केला होता.
मंत्री प्रल्हाद जोशी यावेळी म्हणाले आहेत की, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 21 कोटी 52.5 लाख टन, आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 24 कोटी 85.4 लाख टन, आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 23 कोटी 53.5 लाख टन आा†ण आर्थिक वर्ष 2017-2017 मध्ये 20 कोटी 82.5 लाख टन इतक्या कोळशाची आयात करण्यात आली होती.
कोकिंग कोळसा आा†ण उच्च दर्जाच्या कोळशाचा या एकंदर कोळसा आयातीमध्ये मोठा वाटा आहे, ज्याच्या किंमती थर्मल कोळशापेक्षा जास्त असल्याची माहिती या दरम्यान दिलेली आहे.
चालू आर्थिक वर्षात सप्टेंबरपर्यंत आयात केलेल्या कोळशाची प्रा†त टन सरासरी आवक किंमत 19,324.79 ऊपये होती. याच कालावधीत देशांतर्गत कोळशाची सरासरी आ†धसा†चत किंमत 2,662.97 ऊपये प्रा†त टन असल्याची नोंद आहे.









