स्पाइक एनएलओएस क्षेपणास्त्र प्राप्त
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायलने भारताला नजरेआड असलेल्या शत्रूंच्या ठिकाणांना नष्ट करण्यासाठी स्पाइक नॉन लाइन ऑफ साइट (एनएलओएस) रणगाडाविरोधी गायडेड क्षेपणास्त्रs दिली आहेत. हे क्षेपणास्त्र 30 किलोमीटर अंतरापर्यंत स्वत:च्या लक्ष्यावर हल्ला करू शकते. इस्रायलकडून स्पाइक एनएलओएस क्षेपणास्त्रांची ही खेप भातीय वायुदलासाठी विशेष स्वरुपात खरेदी करण्यात आली आहे. वायुदलाच्या एमआय-17 आणि अपाचे हेलिकॉप्टर्सवर या क्षेपणास्त्रांना तैनात केले जाणार आहे.

भारतीय वायुदलाला स्पाइक एनएलओएस रणगाडाविरोधी गायडेड क्षेपणास्त्रs प्राप्त झाली असून लवकरच त्यांचे परीक्षण केले जाणार आहे. भारतीय वायुदलाने सुमारे दोन वर्षांपूर्वी ही क्षेपणास्त्रs खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यावेळी चिनी सैन्याने पूर्व लडाख क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक मोठ्या संख्येत रणगाडे अन् सैन्याच्या लढाऊ वाहनांना तैनात केले होते.
भारताने सध्या स्पाइन एनएलओएस एटीजीएमची मर्यादित संख्येत ऑर्डर दिली आहे. भविष्यात ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून मोठ्या संख्येत ही क्षेपणास्त्रs प्राप्त करण्यावर विचार केला जाणार आहे. अलिकडेच रशियाविरोधी युद्धात युक्रेनच्या सैन्याने पाश्चिमात्य देशांकडून प्राप्त रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांचा प्रभावीपणे वापर केला होता. अशाप्रकारच्या क्षेपणास्त्रांनी रशियाच्या सैन्याला मोठे नुकसान पोहोचविले होते.
स्पाइन एनएलओएस
मारक पल्ला 32 किमी
वजन 70 किलो
प्लॅटफॉर्म हेलिकॉप्टर
खरेदी करणारे देश अमेरिका, ब्रिटन, दक्षिण कोरिया भारत
एलएलओएसचे वेरिएंट 3 (एमके.2. एमके.4, एमके.5)
युद्धात वापर इराक, अफगाणिस्तान, आर्मेनिया
एमआय-17 वर होणार तैनात
इस्रायली स्पाइक एनएलओएस क्षेपणास्त्राला एमआय-17 हेलिकॉप्टर्सवर तैनात केले जाणार आहे. हे क्षेपणास्त्र दीर्घ अंतरावरून स्वत:चे लक्ष्य नष्ट करण्यास सक्षम आहे. अशा स्थितीत संघर्षादरम्यान शत्रूच्या फायरिंग रेंजमध्ये न येता एमआय-17 व्ही5 हेलिकॉप्टर स्पाइक एनएलओएस क्षेपणास्त्राद्वारे शत्रूचे रणगाडे अन् चिलखती वाहने नष्ट करू शकणार आहे. या क्षेपणास्त्रांचे अनेक वेरिएंट उपलब्ध असून यातील एक मॅन पोर्टेबल व्हेरिएंट भारतीय सैन्याकडून वापरले जाते. हे वेरिएंट चार किलोमीटरपर्यंतच्या शत्रूच्या चिलखती वाहनांना आणि रणगाड्यांना नष्ट करू शकते.









