आयएनएस विक्रांत ही केवळ युध्दनौका नाही तर देशाच्या परिश्रम, प्रतिभेचं प्रतीक आहे. आज देशाच्या नव्या भविष्याचा उदय झाला आहे. या सुवर्ण क्षणाचे आपण साक्षीदार आहोत. विक्रांत ही एकविसाव्या शतकातील भारताच्या भविष्याची नांदी आहे. विक्रांत अमृत महोत्सवातील अतुलनीय अमृत आहे. देशाचं स्वप्न पूर्ण होतंय. भविष्यातील आव्हानांना भारताचं उत्तर म्हणजे विक्रांत आहे. आत्मनिर्भर भारताचं प्रतिबिंब म्हणजे विक्रांत आहे. कितीही मोठी आव्हानं असोत, भारतासाठी काहीही अशक्य नाही. अशी प्रतिक्रिया पंतपधान नरेंद्र मोदी यांनी दिली. आयएनएस विक्रांत ही देशातील पहिली स्वदेशी विमानवाहू युध्दनौका नौदलात समाविष्ट करण्यात आली. हा सोहळा मोदी यांच्या उपस्थितीत कोची शिपर्याडमध्ये संप्पन्न झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोचीमध्ये नौदलाच्या नव्या ध्वजाचं अनावरण केलं. हे करत असताना त्यांनी हा नवा ध्वज नौसेनेचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे. सध्याच्या ध्वजामध्ये सेंट जॉर्जचा क्रॉस लावण्यात आला होता. तसंच एका कोपऱ्यामध्ये तिरंगाही लावण्यात आला होता. मात्र जुन्या ध्वजामध्ये तिरंग्याऐवजी युनियन जॅक लावण्यात आला होता.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले, या स्वप्नाला साकार करणाऱ्या सर्वांचे आभार मानतो. सर्व वैज्ञानिक आणि कर्मचाऱ्यांचे यावेळी अभिनंदन केलं. विक्रांत एक ताकद आहे. स्वदेशी कौशल्याचे प्रतिक आहे, असेही ते म्हणाले.
आयएनएस विक्रांत नेमके कसे आहे
देशातील पहिली विमानवाहू युध्दनौका
विमानवाहू युध्दनौका बनवणाऱ्या ६ देशांत भारताचा समावेश.
यामध्ये विक्रांत वर ३० विमानं तैनात करण्याची क्षमता आहे.
२० लढाऊ विमानं आणि १० हेलिकाॅफ्टरसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
सुरुवातीला ‘मिग-२९ ब्लॅक पॅंथर’ तैनात करणार.
एफ १८ ए सुपर हाॅर्नेट आणि राफेलचाही विक्रांतवर चाचणी.
एकाच खेपेत ७५०० नाॅटिकल मैल जाण्याची क्षमता आहे.
.युध्दनौकेवरील फायटर जेटची २००० मैल झेप घेण्याची क्षमता आहे.
अॅंटी सबमरीन हेलिकाॅप्टर्सची शत्रूच्या पानबुडींवर नजर आहे.
२ हजार तंत्रत्रांकडून १३ वर्षे युध्दनौकेची बांधणी.
युध्दनौकेच्या बांधणीसाठी सुमारे २० हजार कोटी खर्च करण्य़ात आला आहे.
आयएनएस विक्रांत वर १४ डेक आणि २३०० कंपार्टमेंट आहेत.
१७०० नौसैनिक तैनात करण्याची क्षमता आहे.
रोज ४८०० लोकांचा स्वयंपाक बनवण्याची व्यवस्था आहे.
Previous Articleइचलकरंजीत लवकरच अवतणार दूधगंगा
Next Article लोकमान्य सोसायटी-लोककल्प फौंडेशनतर्फे सामाजिक उपक्रम









