वृत्तसंस्था/ हाँगकाँग
येथे झालेल्या विश्व सांघिक स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पुरुष संघाने पाचवे स्थान मिळविले तर महिला विभागात भारताला सातवे स्थान मिळाले.
भारताच्या पुरुष स्क्वॅश संघाने पाचव्या मानांकित मलेशियाला धक्का दिला तर महिलांमध्ये नऊ वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाला धक्का देत उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्यपूर्व फेरीत पुरुष संघाला फ्रान्सकडून 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला तर महिला संघाला अमेरिकेकडून 0-2 याच फरकाने पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला संघ राष्ट्रीय चॅम्पियन अनाहत सिंगच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत खेळत होता. महिला संघाने 12 वर्षांनंतर पहिल्यांच या स्पर्धेची उपांत्यपूर्व गाठली होती. अनाहतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला प्रगती करणारा सर्वोत्तम संघ म्हणून बहुमान मिळाला.









