वृत्तसंस्था/ कोलकाता
ताश्कंदमध्ये रविवारी झालेल्या पाचव्या आशियाई युवा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने सर्वंकष विभागात दुसरे स्थान मिळवले. चीनने सर्वंकष विजेतेपद हस्तगत केले.
या स्पर्धेमध्ये भारतीय अॅथलिट्सनी एकूण 24 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये सहा सुवर्ण, 11 रौप्य आणि 7 कास्यपदकांचा समावेश आहे. सदर स्पर्धा 18 वर्षाखालील वयोगटासाठी होती. कुवेतमध्ये 2022 साली झालेल्या या स्पर्धेत भारताने 24 पदकांची कमाई करत दुसरे स्थान मिळवले होते. ताश्कंदमधील या स्पर्धेत भारतीय संघातील महिला धावपटू रेझोना मलिक हिनाने तीन पदकांची कमाई केली असून तिने मुलींच्या 400 मी. आणि सांघिक रिले या प्रकारात दोन सुवर्णपदके तर मुलींच्या 200 मी. धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक मिळवले.









