वृत्तसंस्था/ निकोसिया, सायप्रस
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ शॉटगन वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ट्रॅप शूटिंग नेमबाजांना वैयक्तिक प्रकारांत अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. ऑलिम्पिकपटू कीनन चेनायकडून मात चांगले प्रदर्शन झाले.
कीनन 24, 24, 22, 24, 23 असे एकूण 117 गुण पुरुषांच्या ट्रॅप पात्रता फेरीत नेंदवले. अंतिम मानांकनात त्याला 17 वे स्थान मिळाले. स्पेनच्या मॅन्युअल मर्सिया व लॅडा डेनिसोव्हा यांनी वैयक्तिक न्यूट्रल अॅथलीट्स म्हणून पुरुष व महिला विभागात सुवर्ण मिळविले. भारताचे शार्दुल विहान व भौनीश मेंदिरत्ता यांनी पुरुष विभागात 62 व 65 वे स्थान मिळविले. महिला ट्रॅप प्रकारात कीर्ती गुप्ता, राजेश्वरी कुमारी व सबीना हॅरिस यांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. मिश्र ट्रॅप सांघिक प्रकारात भारतीय संघ भाग घेणार आहे.









