मायदेशातील आगामी मोहिमांपूर्वी शोधावी लागतील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयसीसीच्या अधिकृत वेबसाइटनुसार शुभमन गिलचा संघ ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविऊद्ध दोन सामन्यांच्या मालिका मायदेशी खेळणार असून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील (डब्ल्यूटीसी) या पुढील मोहिमांपूर्वी भारताला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.
दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा उपविजेता राहिलेला भारतीय संघ या चार घरच्या सामन्यांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्याचे लक्ष्य ठेवेल आणि त्यांच्या पुढील कसोटी सामन्यापूर्वी संघाला किमान पाच ज्वलंत प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. इंग्लंडमध्ये जसप्रीत बुमराहला फक्त तीन कसोटी सामन्यांमध्ये खेळविण्याची योजना काही प्रमाणात उपयुक्त ठरली आणि सहकारी गोलंदाज मोहम्मद सिराजने पाच सामन्यांत जोरदार कामगिरी केल्याने त्याची उणीव भेडसावली नाही. इंग्लंडमधील घडामोडी पाहता आणि विशेषत: 2026 च्या सुऊवातीला होणाऱ्या आयसीसी पुऊष टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, बुमराह या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या चारही घरच्या मैदानावर कसोटी लढती खेळेल अशी अपेक्षा करणे कठीण आहे.
इंग्लंड दौऱ्यात साई सुदर्शन आणि कऊण नायर या दोघांनाही तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली, परंतु इंग्लंडच्या वेगवान माऱ्यासमोर या जोडीला संघर्ष करावा लागून त्यापैकी कुणालाही संधीचा खरोखर फायदा घेता आला नाही. ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविऊद्ध या जोडीला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे आणि भारताची कोणी तरी त्या स्थानावर भक्कम दावा करावा अशी इच्छा असेल. भारतातील परिस्थिती इंग्लंडपेक्षा खूपच वेगळी राहणार असल्याने वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या घरच्या मैदानांवर होणाऱ्या सामन्यांसाठी भारतामध्ये डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा समावेश असेल. कुलदीप यादव इंग्लंडमध्ये खेळण्याची संधी मिळण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण त्याऐवजी अनुभवी रवींद्र जडेजा आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश करण्यात आला आणि या जोडीने संपूर्ण मालिकेत प्रत्येकी सात बळींसह उत्तम कामगिरी केली.
सध्या जडेजा भारतीय कसोटी संघातील निश्चितच स्टार खेळाडू आहे, परंतु निवड समिती वॉशिंग्टन सुंदरला संघात संधी देत राहील का आणि नितीश कुमार रे•ाrलाही संधी मिळेल का हे पाहावे लागेल. वॉशिंग्टन आणि रे•ाr हे भारतीय क्रिकेटचे भविष्यातील स्टार आहेत आणि जडेजा त्याच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्याच्या खूप जवळ आहे. म्हणून तऊण अष्टपैलू खेळाडूंना अधिक संधी मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या मालिकेत भारताला सर्वांत जास्त गरज असताना मोहम्मद सिराज मदतीला आला आणि वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यांत उतरताना तो आत्मविश्वासाने भरलेला असेल. सिराजला येथे इंग्लंडमधील त्याच्या प्रयत्नांची बरोबरी करणे कठीण होईल. नाही तरी या 31 वर्षीय खेळाडूची भारतापेक्षा विदेशातील कसोटी सामन्यांतील गोलंदाजीची सरासरी खूपच चांगली आहे. सिराज सर्व परिस्थितीत यशस्वी होऊ शकतो.









