वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने कनिष्ठांच्या डेव्हिस चषक आशिया ओसेनिया पात्र फेरीच्या टेनिस स्पर्धेत नवा इतिहास नोंदविला. भारतीय संघाने पात्र फेरीची ही स्पर्धा जिंकताना अंतिम लढतीत जपानचा 2-1 असा पराभव केला.
शनिवारी येथील आर के. खन्ना स्टेडियममध्ये झालेल्या या अंतिम लढतीत पहिल्या एकेरी सामन्यात जपानच्या नाओया होंडाने भारताच्या भुषण हेओबामचा 6-3, 3-6, 6-2 असा पराभव केला त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात भारताच्या रूशील खोसलाने जपानच्या तोमिदाचा 6-3, 3-6, 6-0 असा पराभव करत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर भारताच्या टेनिसपटूंनी दुहेरीच्या सामन्यात जपानचा 6-3, 6-4 असा पराभव करत जेतेपद निश्चित केले.









