प्रतिनिधी/ बेळगाव
भारत विकास परिषदेचा 63 वा राष्ट्रीय स्थापना दिवस, डॉक्टर्स डे व चार्टर्ड अकौंटंट डे असा संयुक्त कार्यक्रम गुरुवारी जी. जी. सी. सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सूरज जोशी आणि सीए संजीव अध्यापक उपस्थित होते.
प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदेमातरम प्रस्तुत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भारतमाता, स्वामी विवेकानंद व भारत विकास परिषदेचे संस्थापक डॉ. सूरज प्रकाश यांच्या प्रतिमांचे पूजन व त्यानंतर दीपप्रज्वलन झाले. परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. स्वाती घोडेकर यांनी भारत विकास परिषदेची राष्ट्रीय ध्येयधोरणे व सेवाकार्याची माहिती दिली. प्राचार्य व्ही. एन. जोशी यांनी बेळगाव शाखेच्या वाटचालीचा आढावा घेतला. डॉ. जे. जी. नाईक आणि सीए श्रीनिवास शिवणगी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
संजीव अध्यापक व सूरज जोशी यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. जोशी व सीए अध्यापक यांनी कृतज्ञता व्यक्त करून परिषदेच्या भावी राष्ट्रीय कार्याला शुभेच्छा दिल्या.









