वृत्तसंस्था / कोलंबो
17 वर्षांखालील वयोगटातील सुरू असलेल्या सॅफ पुरूषांच्या फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने नेपाळचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या उपांत्य सामन्यात भारताने नेपाळचे आव्हान 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी संपुष्टात आणले. आता भारत आणि बांगलादेश यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
उपांत्य फेरीच्या लढतीत मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांकडून खाते उघडले न गेल्याने गोलफलक कोराच राहिला. 61 व्या मिनिटाला जुन्लेबाने भारताचे खाते उघडले. त्यानंतर 80 व्या मिनिटाला भारतीय संघातील बदली खेळाडू अझलन शाहने 80 व्या मिनिटाला आणि टी. डायमंड सिंगने 94 व्या मिनिटाला गोल नोंदविल्याने नेपाळचे आव्हान 3-0 असे एकतर्फी संपुष्टात आणले. या स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा 2-0 अशा फडशा पाडत अंतिम फेरी गाठली आहे.









