वृत्तसंस्था/ मस्कत
दीपिका सोरेंग व मुमताझ खान यांनी नोंदवलेल्या प्रत्येकी दोन गोलांमुळे भारतीय महिला हॉकी फाईव्ह संघाने येथे सुरू झालेल्या एफआयएच हॉकी फाईव्ह महिला विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली. गट क मधील सामन्यात भारताने पोलंडवर 5-4 असा निसटता विजय मिळविला.
मुमताझने चौथ्या व 23 व्या मिनिटाला तर दीपिकाने सहाव्या व 29 मिनिटाला भारताचे गोल नोंदवले आणि 23 व्या मिनिटाला मारियाना कुजुरने एक गोल नोंदवला. पोलंडतर्फे ज्युलिया कुचरस्काने 8 व्या, कर्णधार मार्लेना रायबाशाने 10 व्या, पॉला स्लाविन्स्काने 27 व्या, मोनिका पोलेवझॅकने 29 व्या मिनिटाला गोल केले. भारताची पुढील लढत अमेरिकेशी होणार आहे.









