दोन्ही देश संस्कृती अन् इतिहासाने जोडले गेलेले
भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान संस्कृती आणि भाषेच्या इतिहासासोबत अत्यंत दृढ संबंध आहेत. दोन्ही देशांमधील संबंध कुठलीच शक्ती कमकुवत करू शकत नसल्याचे शाह यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर स्थित एकीकृत तपास चौकशी (आयसीपी) पेट्रापोलमध्ये आयोजित कार्यक्रमात लँड पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया अन् बीएसएफ यांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन अन् भूमिपूजन शाह यांच्याहस्ते झाले आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात दृढ संबंध आहेत. आमची संस्कृती, धर्म, प्रथा-परंपरा आणि जीवनशैली हजारो वर्षांपासून परस्परांमध्ये जोडली गेलेली आही. भारताने बांगलादेशच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
यादरम्यान बोलताना शाह यांनी आमचे सीमा सुरक्षा धोरण स्पष्ट असून आम्ही सीमावर्ती क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करू पाहत असल्याचे म्हटले आहे. देशाच्या उर्वरित हिस्स्यांप्रमाणेच सीमावर्ती क्षेत्रांमधील गावांमध्ये कल्याणकारी योजनांच्या सुविधा पोहोचविण्यात आल्या आहेत. गावांची कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या दिशेन आम्ही काम करत करत आहोत असे शाह यांनी म्हटले आहे.
लँड पोर्ट अथॉरिटी ही भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देणारी संस्था आहे. याचबरोबर भारताच्या मैत्रीचा संदेश देणारा राजदूत देखील आहे. आमच्या 15 हजार किलोमीटर लांबीची भूमी सीमा आणि दक्षिण आशियातील सर्व देशांसोबत आमचे सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यासाठी लँड पोर्ट अथॉरिटीची महत्त्वाची भूमिका आहे. पंतप्रधान मोदींनी या संस्थेला एकप्रकारे नवी दिशा, नवा वेग आणि नवा आकार देण्याचे काम केल्याचे उद्गार शाह यांनी काढले आहेत.









