मेघालय विधानसभा निवडणुकीमुळे निवडणूक आयोगाचा निर्णय
कोहिमा
मेघालय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने भारत-बांगलादेश सीमा सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आसामसोबतची आंतरराज्य सीमा देखील 2 मार्चपर्यंत सील करण्याचे आदेश देण्यात आल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एफआर खारकोंग यांनी शनिवारी सांगितले. मेघालयापासून बांगलादेशची सीमा 443 किमी अंतरावर आहे. तरीही विधानसभा निवडणुकीमुळे पूर्णपणे सावधानता बाळगण्यात आली आहे. मेघालय विधानसभेच्या 60 पैकी 59 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. याची मतमोजणी 2 मार्चला होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.









