हंगेरी
भारताच्या अँटिम पंघाल आणि हर्षिताला बुडापेस्ट रँकिंग सिरीजमध्ये सुवर्णपदक पटकविले आहे, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेती अँटिम पंघालने 53 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत नतालिया मालिशेवाचा 7-4 असा पराभव केला,तर हर्षिताने तिच्या चारही राउंड-रॉबिन सामने जिंकून 72 किलो मध्ये सुवर्णपदक पटकविले.
अँटिम पंघालने तुर्कीच्या झेनेप येटगिलला 10-0 असा पराभव करत पॅरिस ऑलिंम्पिकचा पराभवाचा बदला घेतला आणि उपांत्य फेरीत अमेरिकेच्या फेलिसिटी टेलरला 10-0 असे पराभूत केले. या स्पर्धेतने हर्षिताने तिचे चारही राउंड-रॉबिन सामने जिंकून विजेता ठरली आहे, तर गतविजेती आशियाई विजेती आणि जागतिक रौप्यपदक विजेती कझाकस्तानची झमिला बाकबर्गेनोवा हिला 10-0 असे पराभूत केले. अलिकडेच उलानबातर रँकिंग सिरीज आणि आशियाई अंडर-20 चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक विजेता 19 वर्षीय या खेळाडूने फ्रान्सच्या पॉलीन लेकार्पेंटियरलाही पराभूत केला. केसेनिला बुराकोवा ‘फॉल बाय‘ आणि क्रिस्टीना ब्रात्चिकोवाविरुद्ध वॉकओव्हर मिळाला. 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत अमेरिकेच्या माजी विश्व आणि ऑलिंम्पिक चॅम्पियन हेलेन मारौलिसने लढत केल्याने आशादायक किशोरवयीन नेहा सांगवानला रौप्यपदकावर तर नीलमला 50 किलो वजनी गटात कांस्य पदकावर समाधान मानावे लागले









