व्हाईटवॉश टाळण्याचा भारतीय संघ करेल प्रयत्न, विराट कोहली-रोहित शर्मावर राहील लक्ष
वृत्तसंस्था/ सिडनी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज शनिवारी होणार असून यावेळी क्रिकेट रसिकांच्या भावना उचंबळून येतील. कारण ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील हा विराट कोहली आणि त्याच्या साथीदार रोहित शर्मा यांचा शेवटचा सामना ठरू शकतो.
रोहित शर्माने 97 चेंडूत 73 धावांची लढाऊ खेळी केल्याने त्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, परंतु या सामन्यात भारताला पराभूत व्हावे लागले. मात्र कोहलीला दोन वेळा खाते उघडता आले नसून सलग दोन वेळा शून्यावर बाद होण्याची ही त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलीच खेप आहे. ही त्याच्या शेवटाची सुऊवात तर नाही ना असा विचार त्याच्या कट्टर चाहत्यांच्या मनात निश्चितच येईल. रोहित पहिल्यांदा 2007-08 मध्ये सीबी मालिकेसाठी येथे आला होता, तर कोहलीचा वरिष्ठ संघासोबतचा पहिला दौरा 2011-12 च्या हंगामात घडला होता. तेव्हा त्याने अॅडलेड येथे कसोटी शतकासह झटपट प्रभाव पाडला होता.
पुढील दोन वर्षांत ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका होणार नसल्याने हे दोघे पुन्हा सदर देशामध्ये भारतीय संघातर्फे खेळताना दिसतील असे वाटणे अशक्य आहे. विशेषत: ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर कोहली खेळत राहील की नाही हाच प्रश्न आहे. ऑस्ट्रेलियाने आधीच मालिका जिंकलेली असली, तरी प्रतिष्ठित एससीजीवरील हा शेवटचा एकदिवसीय सामना महत्त्वपूर्ण राहील. एससीजीवर चाहत्यांना आधुनिक काळातील या दिग्गज फलंदाजाकडून कव्हर ड्राइव्ह आणि काही ऑन-ड्राईव्ह आणि एक्स्ट्रा कव्हरवरून हाणले जाणारे इनसाइड आउट अशा प्रकारचे फटके पाहण्याची इच्छा असेल.
गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघ 0-3 असा व्हाईटवॉश टाळण्याचा प्रयत्न करत असल्याने हा सामना महत्त्वाचा आहे. एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा जरी दोन वर्षांनी होणार असली, तरी असा व्हाईटवॉश निश्चितच चांगला दिसणार नाही. त्यातच एससीजीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गेल्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये ’मेन इन ब्ल्यू’ संघाने फक्त एकदाच विजय मिळविलेला आहे. कर्णधार शुभमन गिल आणि कोहली दोघेही मोठी खेळी करण्यासाठी उत्सुक असतील आणि गंभीरला शेवटच्या सामन्यात दोघांकडूनही चांगली कामगिरी अपेक्षित आहे.
गेल्या दोन सामन्यांमध्ये पराभूत झालेला भारतीय संघ गोलंदाजीच्या संसाधनांशी तडजोड करून, विशेषत: कुलदीप यादवसारख्या खऱ्या मॅचविनरकडे दुर्लक्ष करून, फलंदाजी सुधारण्याच्या त्यांच्या पद्धतीचा पुनर्विचार करण्यास उत्सुक असेल. अॅडलेड ओव्हलवर कुलदीप खूप प्रभावी ठरला असता. कारण ऑस्ट्रेलियन फलंदाज अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरचे चेंडू ओळखण्याच्या बाबतीत संघर्ष करत होते. सध्याच्या भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडूंना खेळवण्याकडे कल आहे. परंतु त्यापैकी बहुतेक जण मर्यादित प्रभाव पडताना दिसत आहेत.
नितीशकुमार रे•ाrसारख्या खेळाडूचा फलंदाजी क्रमात 8 व्या क्रमांकावर फारसा उपयोग होत नाही आणि ताशी 120 किलोमीटरांहून थोड्या अधिक वेगाने येण्राया त्याच्या चेंडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फलंदाजांना नियमितपणे त्रास देता आलेला नाही. हर्षित राणाच्या बाबतीत, त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्पेलमधील गतीतील लक्षणीय घट हे स्पष्ट करते की, तो अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी का पूर्णपणे तयार नाही. परत येऊन त्याच तीव्रतेने दुसऱ्या आणि तिसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करणे हे कौशल्य रेड बॉल क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षे केलेल्या परिश्रमानंतर, वेगवेगळ्या सामन्यांच्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या वातावरणात गोलंदाजी केल्यानंतर येते. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कृष्णाची संघात उपस्थिती ही काळाची गरज आहे.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये अक्षर पटेलची कामगिरी हे एक सकारात्मक वैशिष्ट्या राहिलेले असून फलंदाज म्हणून त्याची सुधारणा आणि फलंदाजांना बांधून ठेवत सतत टाकलेली षटके लक्षणीय राहिलेली आहेत. जर अक्षर अशीच कामगिरी करत राहिला, तर भारताला 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजाला परत बोलावण्याची गरज भासणार नाही. ऑस्ट्रेलियन संघाचा विचार केला तर, त्यांनी पुढील एकदिवसीय विश्वचषकाकडे पाहून त्यांचा दोन वर्षांचा प्रवास खंबीरपणे सुरू केला आहे. मॅथ्यू शॉर्ट, मिशेल ओवेन आणि कूपर कॉनोली यासारख्या खेळाडूंनी थोड्याशा दबावाच्या परिस्थितीत नियोजन आणि अंमलबजावणी करताना प्रशंसनीय तंत्र आणि क्रिकेटमधील हुशारी दाखवली आहे. मॅट कुहनेमन, ज्याने पावसाने व्यत्यय आणलेल्या पहिल्या सामन्यात भारताला त्रास दिला होता, तो अॅडम झॅम्पासोबत 11 खेळाडूंमध्ये सामील होऊ शकतो. ऑस्ट्रेलियाला सलामवीर ट्रॅव्हिस हेडकडून नेहमीप्रमाणे तडाखेबंद खेळी अपेक्षित असेल. अशा प्रकारची खेळी त्याला मागील दोन सामन्यांमध्ये करता आलेली नाही.
संघ-भारत : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीशकुमार रे•ाr, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, अॅलेक्स केरी, जोस इंग्लिस, कूपर कॉनोली, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जॅक एडवर्ड्स मिचेल ओवेन, जोश फिलिप, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, अॅडम झॅम्पा, मॅट कुहनेमन.
सामन्याची वेळ : सकाळी 9 वा.









