नवी दिल्ली : “आज, सौर ऊर्जेमध्ये संपूर्ण जग आपले भविष्य पाहत आहे. भारतीय लोक शतकानुशतके सूर्याची फक्त पूजाच करत नाहीत तर त्या सुर्य भारतीयंच्या जीवनशैलीच्या केंद्रस्थानी देखील आहे.” असे सांगून भारतातील अनेक भागांमध्ये छटपुजेद्वारे सूर्यदेवतेची पुजा केली जाते सौरऊर्जेपासून वीज निर्मिती करण्यात भारत आघाडीवर आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले. ते आपल्या मन की बात या आपल्या ९४ व्या कार्यक्रमात देशाला संबोधित करताना बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, “आपल्या पारंपारिक अनुभवाला आधुनिक विज्ञानाशी जोडून, सौरऊर्जेपासून वीज निर्मिती करण्यात भारत आघाडीवर आहे, सौरऊर्जेने भारतातील गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले आहे.” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील मोढेरा गावाला काही दिवसापुर्वीच देशातील पहिले पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे गाव घोषित केले होते. मोढेरा येथील घरांवर 1,000 हून अधिक सौर पॅनेल बसवण्यात आले आहेत, जे गावकऱ्यांसाठी २४ तास वीज निर्माण करून गावकऱ्यांना शून्य खर्चात सौरऊर्जा उपलब्ध करून दिली जाते. याची आठवण करून देताना पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा’ एवम ‘उत्थान महाभियान’ (पीएम कुसुम) योजनेतील शेतीसाठी सौरऊर्जेचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या काही उदाहरणांचाही दाखला दिला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









