वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या 6 डिसेंबरला दिल्लीत बोलविण्यात आलेली ‘इंडिया’ आघाडीची बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदरची बैठक नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. मात्र आघाडीतील काही सदस्यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमांचे कारण देत तातडीने दिल्लीत येण्यास नकार दिल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. शिवाय काही घटक पक्षातील सदस्यांनी काँग्रेसच्या पराभवाबद्दल प्रतिक्रिया दिल्याने काँग्रेस पक्षानेही नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील यश-अपयशाबद्दल चर्चा करण्यासाठी इंडिया आघाडीची 6 डिसेंबरला बैठक होणार होती.









