कोल्हापूर
हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला अटक करा, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारण्याचा इशारा कोल्हापुरातील इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत, या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशारा दिलेल्या इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची सकाळपासूनच कोल्हापूर पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. उद्धवसेनेचे शहर संघटक हर्षल सुर्वे यांना पोलिसांनी सकाळी त्यांच्या घरातून ताब्यात घेतलं तर अन्य पदाधिकाऱ्यांची धरपकडही सुरू आहे.








