वृत्तसंस्था / अँटवर्प (बेल्जियम)
सध्याच्या युरोपच्या दौऱ्यावर असलेल्या भारत अ पुरुष हॉकी संघाला यजमान बेल्जियमबरोबरच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. या सामन्यामध्ये बेल्जियमने भारत अ संघाचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
भारत अ आणि बेल्जियम यांच्यातील सामन्यात कर्णधार संजयने एकमेव गोल भारत अ संघातर्फे नोंदविला. तर या लढतीतील पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत बेल्जियमने तीन गोल नोंदविले. भारत अ संघाने या सामन्यात पेनल्टी कॉर्नरची संधी गमविली. भारत अ संघाच्या तुलनेत बेल्जियमचा खेळ सर्वच विभागात सरस आणि दर्जेदार होता. आता या दौऱ्यातील भारत अ संघाचे उर्वरित दोन सामने नेदरर्लंड्स बरोबर 18 आणि 20 जुलैला खेळविले जाणार आहे.









