कर्णधार अॅकरमनचे शतक, सिराज, आकाश, प्रसिद्ध कृष्णा प्रभावी
वृत्तसंस्था / बेंगळूर
दुसऱ्या आणि शेवटच्या अनधिकृत कसोटी सामन्यात शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर यजमान भारत अ संघाने द. आफ्रिका अ संघावर एकूण 112 धावांची आघाडी मिळविली आहे. तत्पूर्वी कर्णधार अॅकरमनच्या शतकाने द. आफ्रिका अ संघाने पहिल्या डावात 221 धावांपर्यंत मजल मारली. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आकाशदीप हे प्रभावी गोलंदाज ठरले.
या मालिकेतील पहिला सामना यापूर्वी भारत अ ने जिंकून आघाडी मिळविली आहे. या दुसऱ्या सामन्यात भारताचा पहिला डाव 255 धावांवर आटोपल्यानंतर द. आफ्रिका अ संघाने शुक्रवारी आपल्या पहिल्या डावाला सुरूवात केली आणि 47.3 षटकात त्यांचा पहिला डाव केवळ 211 धावांत आटोपला. कर्णधार अॅकरमनने 118 चेंडूत 5 षटकार आणि 17 चौकारांसह 134 धावा जमविल्या. सलामीच्या हर्मनने 5 चौकारांसह 26, कर्णधार अॅकरमनने 118 चेंडूत 5 षटकार आणि 17 चौकारांसह 134, सुब्रमणियनने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 20 धावा जमविल्या. द. आफ्रिना अ संघाच्या पहिल्या डावात केवळ 3 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. त्यांना अवांतराच्या रुपात 18 धावा मिळाल्या. भारत अ संघातर्फे प्रसिद्ध कृष्णाने 35 धावांत 3, आकाशदीप आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्यश्sकी 2 तर कुलदीप यादव आणि हर्षदुबे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. भारत अ संघाने द. आफ्रिका अ संघावर पहिल्या डावात 34 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
34 धावांची बढत घेतल्यानंतर भारत अ संघाने खेळाला पुढे सुरूवात केली आणि दिवसअखेर त्यांनी 24 षटकात 3 बाद 78 धावा जमविल्या. सलामीचा ईश्वरन खाते उघडण्यापूर्वीच बाद झाला. केएल राहुल आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 35 धावांची भर घातली. साई सुदर्शनने 38 चेंडूत 5 चौकारांसह 23 तर देवदत्त पडिकलने 42 चेंडूत 3 चौकारांसह 24 धावा जमविल्या. इंडिया अ संघाने दुसऱ्या डावात 3 बाद 78 धावा जमविल्या. राहुल 3 चौकारांसह 26 धावांवर तर कुलदीप यादवने आपले खाते उघडले नाही. द. आफ्रिका अ संघातर्फे सिलीने 2 तर व्ह्युरेनने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: भारत अ प. डाव 255, द. आफ्रिका अ प. डाव, 47.3 षटकात सर्वबाद 221 (अॅकरमन 134, सुब्रायन 20, हर्मन 5 चौकारांसह 34), भारत अ दु. डाव 24 षटकात 3 बाद 78 (केएल राहुल नाबाद 26, साई सुदर्शन 23, पडिकल 24, सिले 2-28, व्ह्यूरेन 1-15).









