शम्स मुलानीचे 5, सारांश जैनचे 3 बळी
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
रविवारी येथे झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या अनाधिकृत कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी भारत अ संघाने इंग्लंड लायन्स संघाचा 134 धावांनी दणदणीत परभव केला. भारत अ संघाने 3 सामन्यांची ही मालिका 2-0 अशी एकतर्फी जिंकली. या शेवटच्या सामन्यात भारत अ संघातील मुलानीने 60 धावात 5 गडी बाद केले. या सामन्यात भारत अ संघाने पहिल्या डावात 192 धावा जमविल्यानंतर इंग्लंड लायन्सचा पहिला डाव 199 धावात आटोपला. इंग्लंड लायन्सने 7 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर भारत अ संघाने दुसऱ्या डावात 409 धावा जमवित इंग्लंड लायन्स संघाला निर्णायक विजयासाठी 403 धावांचे कठीण आव्हान दिले. इंग्लंड लायन्स संघाचा दुसरा डाव 72.4 षटकात 268 धावात आटोपला. रॉबिनसनने 81, लिसने 55, जेम्स कोलेसने 31 धावा केल्या. मुंबईचा फिरकी गोलंदाज मुलानीने 60 धावात 5 तर सारांश जैनने 50 धावात 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – भारत अ प. डाव 192, इंग्लंड लायन्स प. डाव 199, भारत अ दु. डाव 409, इंग्लंड लायन्स दु. डाव सर्व बाद 268.









