वार्ताहर /सांबरा
बेळगाव उत्तर मतदार संघातील अपक्ष उमेदवार नागेश महादेव दिवटे(स्वामी) यांना मतदारांचा दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे. बसवण कुडची येथील रहिवासी असलेले नागेश दिवटे(स्वामी) हे मतदारसंघात भरीव विकासकामे करण्याच्या उद्देशाने, गोरगरीब व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी म्हणून निवडणुकीला उभे आहेत. त्यांना सामाजिक कार्याचीही चांगलीच जाणीव आहे. त्यांनी आतापर्यंत बसवण कुडचीसह कणबर्गी, अलारवाड, मुत्यानटी, यमनापूर, समर्थनगर, हनुमाननगर, मारुतीनगर, गांधीनगर, शिवाजीनगर, रुक्मिणी नगर, महांतेशनगर, ऑटोनगरसह शहरातील चव्हाट गल्ली, भांदूर गल्ली, भडकल गल्ली, खडक गल्ली व परिसरामध्ये प्रचारफेरी काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत. त्यांना मतदारांचाही उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. प्रचारफेरीमध्ये अजित कुगजी, राजू सुंठकर, परशराम कुरबर, भरमा अलारवाड, राजू दिवटे, बाबू बेडका, अर्जुन मुचंडीकर, नितीन तारिहाळकर, विशाल दिवटे, परशुराम अनगोळकर, सचिन खंडोचे, महावीर पुजार, इराप्पा अवरोळी, अर्जुन हलकर्णी, नीलकंठ हिरेमठ (स्वामी), शोभा हिंडलगेकर, सुशा दिवटे, संगीता दिवटे, रेखा दिवटे, माधुरी बेडका, मलप्रभा हिंडलगेकर, कल्पना दिवटेसह समर्थक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.









