क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून स्केटिंग रॅलीचे आयोजन केले होते. याला उतम प्रतिसाद मिळाला.
गोवावेस स्विमिंग पूल स्केटिंग रिंक बेळगाव येथून सुरुवात झालेल्या या रॅलीमध्ये 4 ते 16 वयोगटातील सुमारे 50 स्केटींगपटूनी सहभागी घेतला होता. या रॅलीचे उद्घाटन अॅड. कृष्णकुमार जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ व शाल देऊन करण्यात आले. रॅलीत भारत माता की जय आणि वंदे मातरम्च्या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी तुकाराम पाटील, आर. सुरेश, सागर पाटील, सचिन साळुंखे, स्केटिंग प्रशिक्षक योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गंगणे, सक्षम जाधव, अनुष्का शंकरगौडा, यशपाल पुरोहित, भक्ती हिंडलगेकर, करुणा वाघेला, साई समर्थ, अंजना, तेजस साळुंखे, श्री रोकडे, आदिती साळुंखे, आर्यन साळुंखे, रचित नांगरे, आर्या कदम, सार्थक सामंत, सार्थक चव्हाण, दुर्वा पाटील, अर्शन माडीवाले, सत्यम पाटील, भव्य पाटील, प्रांजल पाटील, अथर्व साळुंखे, स्वरा सामंत, अनमोल चौगुले, श्री पाटील, खुशी अक्षिमणी, कुलदीप बिर्जे, अनघा जोशी, आदेश हलियाल, आराध्या हलियाल, रुत्रा दलवाई, रितेश दो•मणी, सौरभ साळूंखे, सक्षम कलंगडी, रुही कलंगडी, दियान पोरवाल आदी उपस्थित होते.









