प्रतिनिधी/ बेळगाव
‘तरुण भारत’च्या हिंडलगा येथील कॉर्पोरेट कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ‘तरुण भारत’च्या कार्यकारी संचालक रोमा ठाकुर यांच्या संकल्पनेनुसार दरवर्षी ‘तरुण भारत’ परिवारातील एका क्यक्तीला ध्वजारोहणाचा मान देण्यात येतो. यावर्षी आयटी विभागाचे पवन देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर ‘तरुण भारत’च्या सुरक्षा रक्षकांनी शिस्तबद्ध पथसंचलन केले.
त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात संपादक विजय पाटील यांच्या हस्ते पवन देशपांडे यांचा शाल, श्रीफळ व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला. विजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मनीषा सुभेदार यांनी केले. याप्रसंगी व्यवस्थापक गिरीधर शंकर व प्रिंटिंग विभागाचे प्रमुख धैर्यशील पाटील यांच्यासह तरुण भारत परिवारातील विविध सदस्य व विभाग प्रमुख उपस्थित होते.









