प्रतिनिधी/ बेळगाव
अरिहंत हॉस्पिटलमध्ये 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. उद्योजक अविनाश पोतदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डॉ. एम. डी. दीक्षित, अभियंता बकुळ जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
डॉ. एम. डी. दीक्षित म्हणाले, आम्ही वर्षभरात 12 हजारहून अधिक ओपीडी रुग्ण, अडीच हजारहून अधिक रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार केले आहेत. त्याचबरोबर 800 हून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. 1800 हून अधिक रुग्णांवर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. प्रभू हलकट्टी, डॉ. वरदराज गोकाक, डॉ. अभिषेक जोशी, डॉ. प्रशांत एम. बी., डॉ. अविनाश लोंढे, हॉस्पिटलचे व्यवस्थापक यांच्यासह डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.