मालवण -:
मत्स्य विभागाला सातत्याने निवेदने आणि तक्रारी देऊनसुद्धा अवैध पर्ससीन मासेमारी रोखली जात नसल्याने पारंपरिक मच्छीमार १६ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करणार आहेत. याबाबतचे निवेदन आज अखिल महाराष्ट्र मच्छीमार जिल्हा कृती समितीच्या वतीने मत्स्य विभागाला सादर करण्यात आले.









