एसआयपी खात्यांची संख्या 5 कोटीपार ः12 हजार कोटींची गुंतवणूक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीसह जागतिक बाजारात घसरण त्याचप्रमाणे रुपयाची घसरण व वाढती महागाई अशी स्थिती असतानाही गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाप्रती विश्वास दर्शविला असल्याचे दिसले आहे. गेल्या जूनमध्ये एसआयपी खात्याची संख्या 5.55 कोटी इतकी पोहोचत सर्वाधिक राहिल्याची बाब स्पष्ट झाली आहे. याअंतर्गत म्युच्युअल फंडात जूनमध्ये 12,276 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
16 व्या महिन्यातही वृद्धी
महत्त्वाचे म्हणजे म्युच्युअल फंड महागाई व एकंदर नाजूक परिस्थितीतही गुंतवणूकीसाठी उजवा ठरला आहे. म्युच्युअल फंडांसंबंधीची संस्था ऍम्फी यांनी वरील माहिती दिली आहे. त्यांनी केलेलया सविस्तर अभ्यासात ही बाब स्पष्ट झाली आहे. जून महिन्यात सलग 16 व्यांदा इक्विटी फंडात गुंतवणूक वाढल्याचे दिसले आहे.
31 टक्के जास्तच
वर्षाच्या आधारावर पाहता 31 टक्के जास्तच गुंतवणूक दिसली आहे. तर दुसरीकडे जूनमध्ये एसआयपी खात्यांची संख्या सर्वकालीक विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. जूनमध्ये ही संख्या 5.55 कोटीवर पोहोचली होती.
कोणत्या फंडात किती गुंतवणूक झाली ते पाहूया-
स्कीम/फंड गुंतवणूक (कोटी रुपयात)
फ्लेक्सी कॅप……… 2511.74
लार्ज कॅप फंड……. 2130.35
लार्ज ऍण्ड मिड कॅप 1994.73
मिड कॅप फंड……. 1851.67
सेक्टोरल फंड……. 1677.82
स्मॉल कॅप……….. 1615.92
फोकस्ड फंड……… 1191.57
मल्टी कॅप फंड…… 970.24
ईएलएसएस 640.06









