बेळगाव उत्तर मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अमर येळ्ळूरकर यांची प्रचार पदयात्रा आज गांधीनगर परिसरात पार पडली.
शुक्रवार दि. २७ रोजी उत्तर मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अमर येळ्ळूरकर यांनी प्रचारफेरी काढून घरोघरी जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीलाच मत घालण्याची याचना केली. गांधीनगर परिसरात महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुम गेला होता.
याप्रचारात समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.