शहापूर-खासबाग, भारतनगर परिसरात उत्स्फूर्त पाठिंबा
बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघातून म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांची पदयात्रा शुक्रवारी शहापूर परिसरातून काढण्यात आली. बॅ. नाथ पै चौक येथे पै यांचे स्मरण करण्यात आले. सीमाप्रश्नाच्या चळवळीतील योगदान खूप मोठे आहे. त्यांचे ते योगदान कदापिही विसरता येणार नाही. सतत प्रयत्न करून सीमाप्रश्न सोडविण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर लक्ष्मीरोड, सर्वोदय कॉलनी, मेघदूत सोसायटी, कर्मचारी वाडा, भारतनगर, पहिली गल्ली, दुसरी गल्ली, तिसरी गल्ली, बसवाण गल्ली, धामणे रोड, भारतनगर क्रॉस क्रमांक, 6, 7, 8, भारतनगर येथील रयत गल्ली, ढोरवाडा या ठिकाणी पदयात्रेची सांगता झाली. यावेळी उमेदवाराचे स्वागत महादेव पाटील यांनी केले. त्यानंतर त्यांनी उमेदवारांविषयी माहिती दिली.
उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला. फटाक्यांची आतशबाजी करत जल्लोषदेखील साजरा करण्यात आला. माय मराठीच्या जागरणासाठी संपूर्ण जनसमुदाय एकवटला आहे. सर्वत्र भगवे वातावरण निर्माण झाले आहे. भगव्या पताका, टोप्या, ध्वज, फलक झळकत होते. य् ाावेळी कार्यकर्त्यांनी सीमाप्रश्नाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कोंडुस्कर यांचे महिलांनी आरती ओवाळून औक्षण केले. त्यानंतर विविध ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनीदेखील स्वागत केले. कोणत्याही परिस्थितीत विजयी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी म. ए. समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते बाबू कोले, राजू मरवे, श्रीधर खन्नुकर, अनिल अमरोळे, श्रीधर पाटील, युवराज मुरकुंबी, माजी नगरसेवक दिनेश राऊळ, शिवराज शिंदे, शिवराज पाटील, गणपत बामणे, सदानंद मधुकर, प्रभाकर राजू बिर्जे, विजय भोसले यांनी उमेदवारांचे स्वागत केले. भारतनगर गणेशोत्सव मंडळ, शेतकरी संघटना, रयत गल्ली, ढोरवाडा, गणेश युवक मंडळ, भारतनगर, तिसरा क्रॉस यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शविला. प्रशांत भातकांडे, विजय हंडे, सुनील बोकडे, शाम कोंडुस्कर, सागर पाटील, भय्या होसूरकर, उमेश पाटील, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, विशाल कंधारकर, सुनील मादर, उदय पाटील, सागर गुंजीकर, नारायण पाटील, शिवानी पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
आजच्या पदयात्रेचा मार्ग
शनिवारी जुने बेळगाव व वडगाव परिसरात पदयात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी 7 वाजता जुने बेळगाव येथे पदयात्रेला सुऊवात होणार आहे. संपूर्ण जुने बेळगावमधील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर वडगाव येथील विष्णू गल्लीमध्ये पदयात्रा प्रवेश करणार आहे. वझे गल्ली, राजवाडा कंपाऊंड, मंगाईनगर, कारभार गल्ली, पाटील गल्ली, यरमाळ रोड येथे पदयात्रेची सांगता होणार आहे. सायंकाळी 5 वाजता वडगाव गल्ली क्रॉस येथील शिवाजी महाराज पुतळ्याकडून प्रारंभ त्यानंतर संपूर्ण संभाजीनगर, रणझुंझार कॉलनी, केशवनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर, आनंदनगर, नाझर कॅम्प, सोनार गल्ली, रामदेव गल्ली, दत्त गल्ली या परिसरात फेरी काढण्यात येणार आहे. यावेळी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत. तरी या भागातील सर्व आजी-माजी नगरसेवक, पंच मंडळी, युवक मंडळे, महिला मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









