हृदयविकाराचा धक्का अन् मृत्यूची जोखीम 4.5 पट वाढली
मानवी शरीर विशेषकरून मेंदूत मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण वेगाने वाढत आहे. ही वाढ एक गंभीर आरोग्य धोक्याच्या दिशेने इशारा करते. यकृत आणि किडनीच्या तुलनेत मेंदूत अधिक प्रमाणात प्लास्टिकचे अतिसुक्ष्म कण जमा होत आहेत, अशी माहिती प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नियतकालिक नेचर मेडिसीनमध्ये प्रकाशित अध्ययनातून समोर आली आहे. मायक्रोप्लास्टिकमुळे मेंदूच्या मूळ संरचनेत बदल होत असल्याने हृदयविकाराचा धक्का बसणे, स्ट्रोक आल्याने मृत्यूची जोखीम 4.5 पट वाढते. अध्ययनानुसार 1997-2004 दरम्यान करण्यात आलेल्या अनेक उत्तरीय तपासणीदरम्यान मेंदूच्या पेशींमध्ये मायक्रो आणि नॅनो प्लास्टिकचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. याच प्रकारे यकृत, किडनी आणि मेंदूच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला. एकूण 52 मेंदूच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, ज्यात 2016 मधील 28 नमुने आणि 2024 मधील 24 नमुने सामील होते. सर्व नमुन्यांमध्ये प्लास्टिकच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत.
मानवी रक्त् अन् दूधातही मायक्रोप्लास्टिक
संशोधनात मानवी रक्त, आईचे दूध, प्लेसेंटा आणि शरीराच्या अन्य अवयवांमध्ये देखील मायक्रोप्लास्टिकचे पुरावे मिळाले आहेत. परंतु हे सुक्ष्म कण आरोग्याला कितपत प्रभावित करू शकतात, यावर अद्याप आणखी संशोधन करण्याची गरज आहे. तरीही विविध वैज्ञानिक अध्ययनांमध्ये मायक्रोप्लास्टिक मानवी आरोग्यासाठी मोठा धोका ठरत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. नव्या अध्ययनानुसार प्लास्टिक प्रदूषणाचा प्रभाव सातत्याने तीव्र होत आहे. मागील 5 दशकांमध्ये प्लास्टिक प्रदूषण एक गंभीर समस्या ठरली आहे. उंच पर्वतांपासून खोल समुद्रापर्यंत, सर्वत्र प्लास्टिक पोहोचले आहे.
डिमेंशियाग्रस्त लोकांमध्ये प्रमाण अधिक
तंदुरुस्त लोकांच्या तुलनेत डिमेंशिया पीडितांच्या मेंदूत मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण खूपच अधिक आढळून आले आहे. हे प्रमाण सामान्य लोकांच्या तुलनेत 6 पट अधिक होते. डिमेंशियाने होणाऱ्या तंत्रिका क्षरणमुळे मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण वाढू शकते असे वैज्ञानिकांचे मानणे आहे, परंतु मायक्रोप्लास्टिक डिमेंशियासाठी कारणीभूत ठरतो की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. 2016 मध्ये यकृत अन् किडनीच्या नमुन्यांमध्ये प्लास्टिकचे प्रमाण जवळपास समान होते, परंतु मेंदूत हे अत्यंत अधिक होते. 2024 च्या यकृत अन् मेंदूच्या नमुन्यांमध्ये प्लास्टिकचे सुक्ष्म करण 2016 च्या तुलनेत अधिक आढळले. वैज्ञानिकांनी 1997-2013 दरम्यान मेंदूच्या पेशींशी या निष्कर्षांच्या तुलनेत अलिकडच्या वर्षांमध्ये मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण वेगाने वाढले असल्याचे वैज्ञानिकांना आढळून आले आहे.









