मुख्याधिकारी यांना निवेदन सादर
पन्हाळा- प्रतिनिधी
पन्हाळा गरिस्थान नगरपरिषद हद्दतील मालमत्ताधारकांना वाढीव कर आकरण्यात आला आहे. सदरचा वाढीव कर हा नगररचना विभागाच्या वतीने सर्वेक्षण करुन करण्यात आला आहे.पण या कर आकारणीवर हरकत नोंदवण्याची देखील मुदत देण्यात आली होती.तेव्हा पन्हाळा वासियांच्यावतीने या वाढीव कर आकारणीला विरोध होवुन हरकती देखील नोंदवण्यात आल्या आहेत.त्यानुषंगाने गुरुवार 29 डिसेंबर रोजी याबाबत सुनावणी ठेवण्यात आली होती.पण सदरची सुनावणी वेळेत सुरु न होता.सुनावणी घेणारे नगरचना अधिकारी येण्याअगोदरच नागरिकांचे जबाव नोंदवले जावु लागल्याने ही सुनावणी बेकायदेशीर रित्या व चुकीच्या पद्धतीने होत असल्याने,पन्हाळा नागरिकांनी यावर बहिष्कार घातला.याबाबत मुख्याधिकारी यांना नागरिकांच्यावतीने निवेदन देण्यात आले.
या दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की,गुरुवारी नगरपरिषदेच्या नोटीसप्रमाणे पन्हाळ्यातील नागरिक वेळेत हजर राहिले होते.पण दुपारी बारा वाजेपर्यंत कर मुल्याकं व निर्भारण अधिकारी मलकारपुर येथे सुनावणी चालु असलेने ते पन्हाळा येथे उपस्थित राहु शकले नव्हते.तसे मुख्याधिकारी यांनी नागरिकांना तोंडी कळवले.मात्र घाईगडबडीने संबंधित अधिकारी येण्यापूर्वीच नोटीसा देवुन चौकशी पुर्ण करणेचा नगरपरिषदेचा इरादा अाहे.सदरची चौकशी कामी एकाचवेळी 300 ते 350 जणांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.तसेच फक्त 1 ते 2 दिवस अगोदर नोटीस देवुन तरी देखील नागरिक हजर होते.या सुनावणीसाठी रितसर व योग्यरित्या चौकशी होण्यासाठी प्रत्येकवेळी 50 लोकांना टप्प्याने-टप्प्याने बोलावुन तेही यांना 3 दिवस अगोदर नोटिसा देणे कायद्याने गरजेचे आहे.पण तसे काहीच प्रक्रिया नगरपरिषदेकडुन झालेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
तरी सदरच्या चौकशीचे काम रद्द करुन फेर सुनावणी घेण्यात यावी.या सुनावणीची किमान 5 ते 7दिवस अगोदर नोटीस देवुन कार्यवाही करणेत यावी.अशी आक्रमक भुमिका यावेळी नागरिकांच्या वतीने मांडण्यात आली आहे.त्यामुळे पन्हाळ्यावर कर आकारणीचा मुद्दा चांगलाच रंगला आहे.
लवकरच याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देखील समस्त पन्हाळा वासियांच्यावतीने देण्यात येणार असल्याचे नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले.त्यामुळे नागरिकांच्या म्हणण्यानुसार बेकायदेशीर रित्या सुनावणी झाली असल्याने यावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन चौकशी होणार काय..?कर आकारणी कमी होणार काय..? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान,दुपारी 2 नंतर करमुल्याकंन निर्भारण अधिकारी यांनी येवुन काहींच्या हरकतीवर सुनावणी दिली असल्याचे नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले.









