प्रतिनिधी/ बेंगळूर
निपाणी येथील श्रीराम मंदिराला धमकीपत्रे आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरांमध्ये सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. सर्व मंदिरांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येईल, अशी माहिती परिवहन आणि धर्मादाय खात्याचे मंत्री रामलिंगारे•ाr यांनी दिली.
दावणगेरे येथे शनिवारी पत्रकारांशी ते बोलत होते. निपाणीतील रामंदिर बॉम्बस्फोटाने उडवून देण्यासंबंधी धमकीपत्र आले आहे. त्यामुळे मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्याची सूचना धर्मादाय खात्याच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिली आहे. अनेक ठिकाणी धमकीपत्रे, ई-मेल पाठविण्यात येत आहेत. अशा व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहेत. मंदिरांमधील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात येत आहे. पोलीस यंत्रणाही याबाबत सतर्क आहे, असे त्यांनी सांगितले.









