पावसाला प्रारंभ झाल्याने ताडपत्र्यांची खरेदी
बेळगाव : पावसाळय़ाला सुरुवात झाल्याने विविध कारणांसाठी वापरल्या जाणाऱया ताडपत्र्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. विविध आकारामध्ये आणि रंगीबेरंगी ताडपत्र्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. विशेषतः पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी शेतकरी, मालवाहू वाहनधारक, हमाल, फेरीवाले आणि लहान दुकानदारांकडून या ताडपत्र्यांची खरेदी होते. त्यामुळे आता ताडपत्र्यांची मागणी आणि खरेदी वाढत आहे.
शेतकरी सुका चारा खराब होऊ नये आणि घराशेजारी असलेल्या शेडवर झाकण्यासाठी ताडपत्र्यांचा वापर करतो. मालवाहू ट्रक, ट्रक्टर, रिक्षा आणि इतर वाहनांना पावसाळय़ात झाकण्यासाठी ताडपत्रीला अधिक पसंती असते. त्यामुळे दमदार पावसापूर्वी ताडपत्र्यांची मागणी वाढली आहे. दुचाकींवर झाकण्यासाठी विशिष्ट आकारामध्ये कव्हर दाखल झाले आहेत. त्यांनाही मागणी वाढली आहे. बाजारात चांगल्या प्रतीच्या 6ƒ6 आकाराच्या ताडपत्रीची किंमत 150 रुपये, 8ƒ12 ची 290 रु., 8ƒ15 ची 360 रु., 8ƒ18 ची 430 रु., 8ƒ21 ची 500 रुपये अशा विविध आकारानुसार ताडपत्र्यांच्या किमती आहेत. शिवाय दोनशे रुपयांपासून अडीचशे रुपयांपर्यंत दुचाकीच्या कव्हरचे दर आहेत.
शेतकरी पावसाळय़ात स्वतःचे संरक्षण करण्यासाठी खोळ प्लास्टिकचा अधिक वापर करतात. दरवषी शेतकऱयांकडून या प्लास्टिकला मागणी असते. साधारण 30-40 रुपयांपर्यंत खोळ प्लास्टिकचा दर आहे.









