जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समुदायातील वकिलांना महिन्याला 3 हजार 500 रुपये दिले जातात. मात्र, ही रक्कम काही मोजक्मयाच वकिलांना दिली जाते. याचबरोबर देण्यात येणारी रक्कम अत्यंत कमी आहे. तेव्हा महिन्याला किमान 10 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी वकिलांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वकील व्यवसाय करणाऱया मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींना ही रक्कम दिली जाते. काही मोजक्मयाच व्यक्तींना ही रक्कम देण्यात येते. तेव्हा जास्तीत जास्त वकिलांना ही रक्कम दिली पाहिजे. मात्र, काही मोजक्मयाच वकिलांना ही रक्कम मिळते. तेव्हा अर्ज केलेल्या इतर सर्व वकिलांनाही ही रक्कम मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
महत्त्वाचे म्हणजे सध्याच्या महागाईमध्ये देण्यात येणारी तुटपुंजी रक्कम कुचकामी आहे. तेव्हा महिन्याला किमान 10 हजार रुपये द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. यावेळी ऍड. एन. आर. लातूर, ऍड. अनिल शिंदे, ऍड. दऱयाप्पा बिळगी, ऍड. रोहित लातूर, ऍड. यशवंत लमाणी, ऍड. कुमार सरवदे, शीतल बिलावर व इतर वकील उपस्थित होते.









