ग्रामस्थांची जोरदार मागणी : पावसाळ्य़ात आठवडाभर तुटतो राज्याशी संपर्क
रामानंद तारी/कुंभारजुवे
आखाडा ते सांतईस्तेव्ह चर्चपर्यंतचा हमरस्ता मोठय़ा पावसात मांडवी नदीला पूर येऊन पाण्याखाली जाऊन आखाडा बेटांशी संपर्क तुटतो. ही स्थिती दोन आठवडे राहाते. त्यामुळे विधार्थी, कामगार, मच्छीमार विपेत्यां महिला, नागरिक यांना त्याचा सामना करावा लागतो. त्यामुळे हा हमरस्ता कमीत कमी दीड मीटर उंच करण्याची नितांत गरज आहे. तरी अजूनपर्यंत याकडे लक्ष देण्याची कुणी तसदी घेतली नाही. परिणामी आखाडा, करपीन, टोलटोवासियांत कमालीची नाराजी पसरली आहे.
आखाडा येथील लोकांनी पूर्वीपासून वाहतुकीची गंभीर समस्या अनुभवली आहे. होडीने प्रवास करणे, बांधावरुन टोंक इथे, तसेच वाणसो बांधावरुन जाऊन तारीमार्गे कुंभारजुवे इथे बस पकडणे अशा दिव्यातून त्यानी वाटचाल केली आहे. येण्या जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने पूर्वीच्या काळी इथे सहसा कुणी सोयरीकही जुळवीत नव्हते असे येथील वयस्कर लोकांनी डोळय़ात पाणी आणून सांगितले.
या पाश्वभूमीवर तीन वाटो सांतईस्तेव्ह इथे बससेवा सुरू झाली आणि आखाडावासियांना त्या गंभीर समस्येवर काही अंशी उतारा मिळाला. काही वर्षांनी आखाडापर्यंत रस्ता झाल्यावर कंदब बससेवा नंतर खासगी बससेवा सुरू झाली व इथल्या लोकांची सोय झाली.
आखाडा हे सांतईस्तेव्ह पंचायत क्षेत्रातले सुंदर बेट आहे पण विकासाच्या बाबतीत पंचायतीकडून या बेटाला दुजाभाव करण्यात आलेला आहे. हल्ली 2005 साली या इथे एकेरी नवीन पूल आखाडावासियांसाठी तत्कालीन वाहतूकमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या प्रयत्नाने अंतर्गत वाहतुकीसाठी खुला झाला होता आणि चार चाकी व अवजड वाहने आत येण्यासाठी संधी मिळाली होती. त्यामुळे इथल्या अनेक समस्या दुर झाल्या.
स्थानिक पंच सदस्य सुरेंद्र वळवईकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे तत्कालीन समाज कार्यकर्ते राजेश फळदेसाई यांच्या पूर्ण आर्थिक मदतीने आखाडा बेटाला डांबरी रस्ता मिळवून दिला व चार चाकी वाहने कित्येकांच्या दारात नेणे शक्मय झाले गॅस सिलेंडरची गाडी, 108 रुग्णवाहिका, अशी अनेक कामेही मार्गी लागली ही वस्तुस्थिती आहे.
परंतु पावसाळय़ात इथल्या लोकांच्या मनात सदोदित एक भय असते ते की मांडवीला धुवांधार पावसात मोठा पूर येऊन तारजो खाजनाच्या बांधावरुन पाणी खाजन शेतीत घुसल्याने पाणी भरून सदर हमरस्त्यावरुन वाहणार आणि सदर हमरस्ता पाण्यात बुडणार. वाहतूक आणि येणे जाणे बंद होऊन आखाडावासियांचा इतर गावांशी संपर्क तुटणार. ही वस्तुस्थिती असल्याची माहिती इथल्या जे÷ नागरिकांनी प्रतिनिधीला दिली. स्थानिक पंचायतीला आखाडा इथल्या विकासाचे पडलेले नाही अशी तीव्र नाराजी इथल्या नागरीकांनी व्यक्त करून सदर रस्त्याविषयी कोणतेच पाऊल अजूनपर्यंत पंचायतीने उचलले नसल्याची खंत व्यक्त केली.
यंदाच्या पावसाळ्य़ात समस्या भेडसावणार नाही :राजेश फळदेसाई
सांतइस्तेव्ह चर्च ते आखाडापर्यंतच्या रस्त्याला कमीत कमी दीड मिटरची उंची देऊन रस्ता केला तर ही गंभीर समस्या सुटू शकते. यासंबंधी आखाडा येथे हनुमान जन्मोत्सवच्या कार्यक्रमाला आलेल्या स्थानिक आमदार राजेश फळदेसाई यांना प्रतिनिधीने विचारले असता आपण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांसमवेत लवकर या जागेला भेट देऊन या रस्त्याला उंची व बाजूला संरक्षक भिंतीची तजवीज करण्यासंबंधीचे सोपस्कार युद्धपातळीवर पुर्ण करणार आहे. यंदा पावसाळय़ात इथल्या लोकांना ही समस्या भेडसावणार नाही याची ग्वाही आपण आमदार या नात्याने देतो. तसेच या अगोदर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे इथल्या समस्या ही दुर करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तरी स्थानिक आमदार राजेश फळदेसाई यांनी या रस्त्यासंबधी त्वरित कार्यवाही करून पावसाळय़ाअगोदर ही गंभीर समस्या सोडवावी व आमच्या मनातली भीती घालवावी अशी समस्त आखाडा वासीयांची आग्रही मागणी आहे.









