धर्मवीर संभाजी युवक मंडळाचे हेस्कॉमला निवेदन
बेळगाव : धर्मवीर संभाजी गल्ली व महाद्वार रोड मुख्य रस्त्यावरील विद्युतवाहिन्या लोंबकळत आहेत. यामुळे गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान अडथळा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हेस्कॉमने या परिसराची पाहणी करून विद्युतवाहिन्यांची उंची वाढविण्यासोबत एरियल बंच केबल घालण्याची मागणी धर्मवीर छत्रपती संभाजी युवक मंडळाच्यावतीने सोमवारी हेस्कॉमकडे करण्यात आली. गणेशोत्सव मिरवणुकीवेळी लेंबकळणाऱ्या विद्युतवाहिन्यांमुळे धोका वाढत आहे. तसेच कपिलेश्वर विसर्जन तलावाकडे मोठ्या संख्येने सार्वजनिक गणेशमूर्ती येत असतात. त्यामुळे धर्मवीर संभाजी गल्ली व महाद्वार रोड मुख्य मार्गावरील विद्युतवाहिन्यांची उंची वाढवून, त्या ठिकाणी एरियल बंच केबल घालण्याची मागणी हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंता संजीव हम्मण्णावर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी महाद्वार रोड तसेच धर्मवीर संभाजी गल्ली येथील नागरिक उपस्थित होते.









