सातारा : महागाईला अनुसरून रिक्षाच्या मीटर दरात वाढ करण्यासह इतर मागण्यांचे निवेदन सातारा जिल्हा रिक्षा वाहतूक संघाने आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना दिले. या निवेदनाची प्रत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्याकडे सादर करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, रिक्षाची मीटर दरवाढ ही पहिल्याप्रमाणे प्रत्येकी एक किलो मीटर प्रमाणे असावी. २०१८ साली मीटर दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर स्पेअर पार्टच्या किमती व नवीन रिक्षाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यासह विमा दरवाढ व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दंडात्मक फीमध्ये वाढ झाली. संबंधित दरवाढ कमी करून मिळावी. महागाईला अनुसरून मीटर दरवाढ मिळावी. मागील रिक्षाचे मीटर दरवाढ प्रति एक कि. मी. २० रुपये करण्यात आली होती. आता प्रति कि. मी. ३० रुपये मीटर दरवाढ करण्यात यावी. पुढील प्रत्येक किलोमीटरचा नवीन वाढीव दर २५ रुपये असावा. मीटर कॅलिब्रेशनचा दर हा योग्य असावा. त्याचे शासकीय नियमानुसार मूल्यांकन व्हावे. सातारा शहराची हद्द वाढ लक्षात घेता रिक्षा संकेत व रिक्षा स्टॉपच्या संखेत वाढ करावी. परवाना धारकांचा संपूर्ण नाव पत्ता व मोबाईल नंबर संपूर्ण माहिती ऑनलाईन असून सुद्धा पुन्हा मोबाइल नंबरची सक्ती करू नये, यासह आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. की
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









