होनगा ग्रामपंचायत हद्दीत तीन तलावांची निर्मिती : दमदार पावसामुळे तलावांतील पाणीसाठय़ाची समाधानकारक स्थिती

प्रतिनिधी /बेळगाव
उद्योग खात्री योजनेतून तालुक्यातील अनेक गावांमध्ये तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी काही प्रमाणात पाणीसमस्या मिटत आहे. आता होनगा ग्राम पंचायत क्षेत्रात अरण्य विभागात तीन तलावांची निर्मिती करण्यात आली असून याचा फायदा अनेकांना होत आहे. नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे या तलावांमध्ये पाणीसाठा झाला असून समाधान व्यक्त होत आहे. हेग्गेरी तलावातही मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा झाल्याचे दिसून येत आहे.
उद्योग खात्री योजनेतून बेळगाव तालुक्मयाचा विकास साधण्यात येत आहे. त्यामुळे आता वेगवेगळय़ा ठिकाणी अधिकाऱयांनी तलाव खोदाईचे काम हाती घेतले आहे. होनगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱया अरण्य विभागात हेग्गेरी या तलावाचेही काम पूर्ण झाले आहे. याचबरोबर सारीकोळ आणि बुड्रय़ानकोळ या तलावांचीही कामे पूर्ण झाली आहेत. कामगारांना काम देत हळेहोसूर व बुड्रय़ानकोळ येथे तलाव खोदाई करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
हेग्गेरी, सारीकोळ, बुड्रय़ानकोळ येथे सध्या तलाव खोदाईसाठी उद्योग खात्रीतील कामगारांना काम मिळाले होते. यानंतर शेतामधील पाणंद रस्त्यांच्या डागडुजीसाठी उद्योग खात्रीतून प्रयत्न करण्यात येणार आहेत. या तलावांच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला नव्हता. त्यामुळे तेथील कामगार वारंवार कामाची मागणी करत होते. त्यामुळे परिसरात तलाव खोदाईचे काम देण्यात आले. मागील दोन-तीन वर्षांपासून या तलावांच्या खोदाईचे काम हाती घेण्यात आले.
तत्कालीन ता. पं. कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक सचिव राजेंद्र मोरबद यांनी उद्योग खात्रीतील कामांना गती दिली होती.
रोज 20 हजार कामगारांना काम
या वषीच्या पावसात हे तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव तालुक्मयात उद्योग खात्रीतून काम करणारे कामगार अधिक आहेत. या वषी दररोज 20 हजार कामगारांना काम देण्यात येत होते. आता हेग्गेरी तलावाचे कामही पूर्ण झाले आहे. परिणामी याचा फायदा अरण्य विभागातील वन्यप्राण्यांना होणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.









