वांगी, भेंडी, कारली, लालभाजीच्या दरात घट
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील आठवड्याच्या तुलनेत किरकोळ भाजीपाला बाजारात आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली आहे. विशेषत: वांगी, टोमॅटो, कारली, लालभाजी, पालक, कांदापात, भेंडी आदी भाज्यांचे दर घसरले आहेत. विशेषत: वांगी 10 रुपये किलोने विक्री होऊ लागले आहे. श्रावणात भाजीपाल्याची मागणी वाढते. त्यामुळे दरदेखील काहीसे वाढलेले दिसतात. मात्र तसे न होता सध्या भाजीपाल्याचे दर कमी झाल्याचे दिसत आहेत.
किरकोळ आठवडी बाजारात काकडी 60 रु. किलो, फ्लॉवर 20 रुपये, बटाटा 30रु. किलो, ढबू 40 रु. किलो, गाजर 60 रु. किलो, बिन्स 40 रु. किलो, वांगी 10 रु. किलो, ओलिमिरची 40 रु. किलो, टोमॅटो 25 रु. किलो, भेंडी 40 रु. किलो, दोडकी 60 रु. किलो, कारली 30 रु. किलो, घेवडा 40 रु. किलो, कांदे 30 रु. किलो, शेवग्याच्या शेंगा 20 रुपये, लालभाजी 10 रुपयाला एक, कांदापात 20 रुपयाला पाच, मेथी 10 रुपयाला एक, पालक 20 रुपयाला दोन, कोथिंबीर 20 रुपयाला एक, लिंबू 10 रुपयाला 5 असा भाजीपाल्याचा दर आहे.
मागील आठवड्यात वाढलेल्या भाज्यांचे दर कमी झाले आहेत. गाजर, काकडी, भेंडी आदी भाज्या वगळता इतर भाज्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहे. श्रावण मासाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे मागणीदेखील वाढू लागली आहे. विशेषत: श्रावणात मांसाहार वर्ज्य करून शाकाहारीवर भर दिला जातो. विशेष पूजा अर्चा आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे भाज्यांनाही पसंती मिळू लागली आहे.
श्रावणामुळे फळ फुलांबरोबर भाजी खरेदीलादेखील वेग आला आहे. शिवाय दर कमी असल्याने सर्वप्रकारच्या भाज्या खरेदी करणे सोयीस्कर होऊ लागले आहे. मागील पंधरादिवसापूर्वी भडकलेल्या टोमॅटोचा दरदेखील कमी झाला आहे. शिवाय इतर भाज्यांचे दरदेखील कमी होऊ लागले आहेत. होलसेल भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घसरण होऊ लागली आहे.









